Thursday, January 13, 2011

अहो जोशी काका, तुम्ही मटन खाता का ?

माझ्या पोस्ट प्रश्न ऐकून अचंबित होऊ नका आपण सर्व जन या गोष्टी पासून अवगत नाही तर एका
माझा एक विचार.

जिलेटीन हे गाईच्या/ डुकराच्या कातडीच्या खाली, आणि हाडामधे मुबलक प्रमाणात मिळते. कातडीला गरम पाण्यात बुडवून त्यातले फॅटचे प्रमाण कमी केले जाते. नंतर हाडांचा चूरा करून आणि कातडीचे तुकडे करून ते अर्धा तास २०० डिग्री पर्यंत इंडस्ट्रीयल ड्रायर मधे भाजले जातात. हा चूरा नंतर अल्कली, आणि काही इतर पदार्थ मिळवून पाच दिवस ठेवला जातो आणि नंतर मशीन्स मधे या पासून जिलेटीन एक्स्ट्रॅक्ट केले जाते. संपुर्णपणे वेस्ट प्रॉडक्ट मधून बनवल्या जाणारे जिलेटीन खूप स्वस्त असते.

कॅप्सूल्स कव्हर्स दोन प्रकारचे असतात- व्हेज आणि नॉन व्हेज. मग असं असताना नॉन व्हेज कॅप्सूल्स का वापरल्या जातात भारता मधे? याचं उत्तर आहे किंमत.. व्हेज कॅप्सूल्स कव्हर्स ची किंमत ही नॉन व्हेज पेक्षा निम्म्याने कमी असते . व्हेज कॅप्सूल्स मधे जिलेटीन ऐवजी वनस्पतीजन्य जिलेटीन सदृष्य़ वापरला जातो. अशा प्रकारे चिंधी चोरी करून पैसे वाचवणाऱ्या औषध कंपन्या डॉक्टर्स लोकांना परदेश वारी, कॉन्फरन्सेस साठी पैसे पुरवताना अजिबात हात आखडता घेत नाहीत.

एखादी गोष्ट नॉन व्हेज असेल तर त्याच्या पॅकिंग वर लाल डॉट द्यावा असा संकेत आहे, तोच संकेत कॅप्सूल्स -गोळ्याच्या ही बाबतीत आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे एखादी वस्तू नॉनव्हेज आहे एवढेच सांगणे पुरेसे आहे का- की त्यामधे गोमांस वापरलेले नाही हे डिक्लीरेशन द्यायला हवे ? हा प्रश्न तर खूपच महत्त्वाचा आहे,पण ज्या कडे सगळे नेते लोक पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.

केवळ बंदुकीच्या गोळीच्या काडतूसांना गोमांस चरबी लावली म्हणून इंग्रजांना ज्या प्रकारे जन रोषाचा सामना करावा लागला, तसा पुन्हा कॉंग्रेस सरकारला करावा लागेल का? की स्वातंत्र्यानंतर आलेलं आणि गेल्या काही वर्षात जोपासलेलं मानसिक षंढत्व कुरवाळत जनता गप्प बसेल?

No comments: