Thursday, July 12, 2012

आमचे पुढारी

हल्ली पाप - पुण्य, खर - खोट अस काही राहील आहे अस वाटत तुम्हाला? गुंड बदमाशआमचे पुढारी होतात. आम्ही त्यांना निमूटपणे स्वीकारतो. यथा राजा तथा प्रजा.
 
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सत्य हे पाण्यासारखे नितळ आणि स्वच्छ असते. अनेकलोक त्या पाण्याला गढूळ करण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी घाण ही पाण्याच्या तळाशी जाऊनच पोचते एवढे शास्त्रीय कारण जर सर्व जाती धर्मातल्या लोकांनी ओळखले तर महाराष्ट्राचा विकास दामदुपटीने व्हायला वेळ लागणार नाही. सध्याचे व पूर्वीच्या नतद्रष्ट राजकीय पुढार्यांच्या मुळे आपला महाराष्ट्र 25 वर्षे मागे गेला आहे याची शरम सुद्धा वाटत नाही. नुसते आपले 10 बोटांत 10 सोन्याच्या अंगठया, पाश्वभागाखाली महिद्रची स्कॉरपियो, गळ्यात बायका घालतांत तसे मणभर साखळ्या सारख्या सोन्याच्या चेना, गुजराथमध्ये बायकांचे दल्ले जसे पांढरे कपडे घालतात तसे कपडे घालायचे आणि दिवसभर बोंबलत फिरयाचे. फिरून कंटाळा आला की मांसाहारीवर ताव, संध्याकाळी ढोस ढोस ढोसायची आणि नतंर चौफुला किंवा तत्सम ठिकाणी जाउन तमाशा. अरे हे काही जगणे आहे कां?

1 comment:

Anand Deshpande said...

Kadak!

Eka tari guntha mantrya ne jiv dila aasel he vachun!