Wednesday, May 15, 2013

'गुंठा मंत्री': पूर्वी जमीन मालक, ते आता सुरक्षा रक्षक म्हणून.

कधी काळी ते आई. टी. ची राजधानी पुणे शेजारच्या जमीनचे मालक होते. आणि आता बिल्डर कडून मिळालेले पैसे अविचाराने संपवून आपल्याच जमिनीवर उभ्या राहिलेल्या इमारीतीमध्ये वाचमेनचे काम करत आहेत. अशिक्षित किंवा कमी शिक्षित शेतकरी आता खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत किंवा त्यांच्या उदरनिर्वाह मिळविण्याचे ऑटो वाहनचालक आहेत.



काहीनी पुण्यातील शेतजमीन तीन एकर जमीन विक्री करून .2 कोटी रुपये पेक्षा अधिक कमविले आणि जवळपासच्या गावातील सहा एकर जमीन खरेदी व एक बंगला बांधला आणि एक महागडी एस. यु. व्ही. खरेदी केली. पैसा एक दिवस समाप्त होईल याची त्यांना कधीच कल्पना नव्हती. ते आता एक आणि दीड वर्षांनी महागडी एस. यु. व्ही. विकतात. आणि आता स्वतःची जमीन वरील एका इमारतीत खाजगी सुरक्षा गार्ड म्हणून काम करतात.



ही कथा सर्व शेतकरी बांधवांची सारखीच, ज्यांची पुणे आणि पिंपरी चिंचवड दरम्यान जमीन मालकीची होती. या गावां मधील शेतकर्यांनी 90 टक्के भय किंवा इच्छा असेल किंवा हाव यापैकी एका कारणाने खाजगी बिल्डरला त्यांच्या जमीन विकल्या. जमीन विक्री करून कोटी रुपये प्राप्त झाले तेव्हा काहीनी त्यांच्या नोकऱ्या सोडल्या.



मी त्यांच्या कुटुंबातील वाढदिवस व अनेक उत्सवचा साक्षीदार आहे. एकदा एकाने पाळलेला कुत्र्याचा आणि गाड्याच्या बैलाचा वाढदिवस साजरा केला. काही दोन वर्षे महिंद्र स्कोर्पिओ चालवून. आता खाजगी वाहन ड्राइव्हर म्हणून काम करत आहेत.



मी व्यक्तींचे नावे सांगणार नाही, परंतु येथे वयाच्या 50 वर्षी, एकाला 2008 मध्ये पाच एकर जमीनचे सुमारे 4 कोटी रुपये झाले. पुण्याच्या जवळपास 10 एकर सुपीक जमीन खरेदी केल्यानंतर, तो एक मित्सुबिशी पजेरो खरेदी केली. 18 महिन्यांनंतर विकली आणि एक टाटा सफारी खरेदी केली . 2012 टाटा सफारी विकून आता एक मारुती स्विफ्ट आहे. आणखी एकजण वयाच्या 38 वर्षी, 2006 मध्ये शेती जमीनचे सुमारे 80 लाख रुपये मिळाल्याने त्यांनी काही शेती जमीन खरेदी करून हार्डवेअर स्टोअर उघडले आणि एक ह्युन्दाई सान्त्रो कार विकत घेतली. 2011, तो स्टोअर बंद करून ह्युन्दाई सान्त्रो विकून आता तो स्वत: तीन चाकी चालवतोय. अजून एक जण वयाच्या 40 वर्षी, त्याची पाच एकर जमीन प्राधिकरण मध्ये गेली, आणि आता एक कंत्राटदार सहायक म्हणून काम करत आहे. जमीनशी भावनिक जोड असते, पण शहरीकारानासाठी जमीन जप्त करेन ह्या भीतीने विकतात.

अर्ध अशिक्षित शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना गरजेपेक्षा जास्त खर्च करण्याची सवय , योग्य मार्गदर्शन आणि अनुभव नसताना, नियमित उत्पन्न स्रोत निर्माण न करता देशोधडीला लागतात. ते महाग कार खरेदी आणि त्यांच्या शेजारी पेक्षा एक मोठे घर बांधणी वर भर देतात. गावांमध्ये गाव जेवणाच्या स्पर्धा आणि त्यांच्या लग्नाला समारंभ वर विचार न करता खर्च. आणि एक दिवस, पैसे फक्त त्यांना कोरडा सोडून जातो.

शेती हि आपली पालनहार आहे हे विसरून तिचा बाजारात लिलाव करतात, ती धरणी माता कशी बरे माफ करेल रे. ह्या जन्माची शिक्षा ह्याच जन्मात भोगावी लागते.

आता तरी पैश्याचा माज सोडा हो 'गुंठा मंत्री', चार दिन कि चांदणी आहे हि.

No comments: