एका स्त्री च्या दृष्टि कोनातून :
येतो असा एखादा क्षण जेव्हा तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजता, असं बऱ्याच वेळा होतं आपल्या बाबतीत।
सकाळ पासून मूड जरा खराबच असतो, सकाळचा पहीला चहाही नीट केल्या जात नाही, देवालाही कसाबसाच नमस्कार होतो। ऑफिस ला जायला पावलं घरातून बाहेर पडायला जड़ होतात. रस्त्याला लागल्यावरही आजुबाजुला फ़क्त बघ्यासारखं बघणं सुरु असतं. काम खुप असलं तरी करायची बिलकुल इच्छा होत नाही।
मग येतो एखादा ओळखी च्या व्यक्तीचा फोन आणि होतात गप्पा सुरु।मी सांगते मग माझी सगळी व्यथा. आज उठायला उशीर जाल्या पासून, रोजच्या कामापर्यंत मला आता कंटाळा आलाय इथपर्यंत.
“तुला नं पहिल्यापासूनच सवय आहे, सगळं चांगलं असतांना विनाकारण चिंता करायची। आपल्या आईला लग्नं झाल्यावर किती कामं करायला लागायची माहिती आहे नं तुला?” इथपासुन गावाकडच्या गृहिणींना रोजच किती मरावे लागते शेतात, वगैरे…मी आपली मान डोलावते।
"अरे हो! खरंच आहे की. मी तर खुप मजेत आहे त्यामानाने."
1 comment:
Really True !
Post a Comment