Monday, March 7, 2011

माणुसकीचा प्रत्यय

माझा एक छोटासा अनुभव: (आहे शुल्लक पण वाटले की सांगावे)

वेळ: ०१ मार्च २०११ संध्याकलचे ०५:५०ठिकाण: गोल्फ क्लब रोड, येरवडा

जे घडले माझ्याबरोबर ते कधी कधी आपण दुचाकी स्वारांच्या आयुष्यात तर घडतच असते... ते म्हणजे "गाडी पुम्चर होने। "

गाडी पुम्चर झाल्यावर आपण पुम्चर च्या दुकानात जातो, आणि आजकल चे हे दुकानदार बरोबर आपली गरज पाहून, एकच उत्तर देतात, "साब टुब बदलना पड़ेगा!" आपण कितीही गया वया केलि तरी, ते त्याच उत्तरावर अडून असतात, नाइलाजस्तव आपण ३० रुपयाच्या गोष्टी करीता २०० रुपये घालवून बसतोकाय करणार "अडला हरी , गाढवाचे पाय धरी".

पण माझा अनुभव थोडा वेगला आहेते म्हंझे असे झाले की माझी पण गाडी पुन्चर झाली होती, तब्बल होल्स आणि एक ठिकाणी टायर फाटला होतात्याने जेव्हा चेक केले तेव्हा तो सुधा हेच म्हणालापण मी त्याला म्हणालो, की आज माझ्याजवल फक्त १०० रुपये आहेत, तुम्ही जर हे एवढ्या पैशात करू शकत असाल तर ठीक आहे, नाही तर मी नेतो गाड़ी ढकलत।" तो म्हणाला, "साहेब, जर गाडी आशय अवस्थेत नेली तर, आपले आजुन जास्त नुकसान होईल।" "आपण रहायला, कोठे आहात?" मी उत्तरलो," निगडी" ....

त्याने एक मिनट विचार केला आणि म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुमची गाडी रिपैर करून देतो, पैसे राहू द्यात। " मला माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही, जिथे शहरामध्ये प्रत्येक जन ग्राहकाला लुटायला बसलेला असतो, तिथे हा व्यक्ति मला अगदी देवासारखा वाटला, सर्व काम करायला त्याचा जवळ जवळ तास गेला, त्या नंतर म्हणाला " साहेब, आपल्या गाडीचा टायर ठीक झाला आहे, आपण जाऊ शकता" मी म्हणालो, "तुमचे पैसे मी उद्या नक्की देईन, तुम्ही केलेली मदत मी कधीच विसरणार नाही", तेव्हा तो म्हणाला," साहेब, हे सर्व जग विश्वासावर चालते, मला तुमच्यात भला मानुस दिसला म्हणून मी तुम्हाला मदत केलीपैसे तर मी रोजच कमवतो, म्हटले आज पुण्य कमवून बघुया... तुम्ही पैसे दया अगर नका देऊ, तो परमेश्वर वरून सर्व काही पाहत आहेकालजी घ्या आणि व्यवस्थित घरी पोहचा, आपली कोणी तरी वाट पाहत असेल "....

दुसरया दिवशी मी त्या सदग्रहस्ताला त्याच्या कष्टाचे पैसे देऊ केले... पण एक गोष्ट मी समजलो की, आपण समजतो तेवढे जग निष्ठुर नाहीये।

"विश्वासावर सर्व काही चालते, जिथे विश्वास संपतो तिथे सर्वच संपते..."