Thursday, May 30, 2013

तो ऎकतच नाही, सारखा कार्टून पाहायचं म्हणून हट्ट धरून बसतो

लहान मुलगा बोलालया लागला, तो शिनचॅन सारखाच बोलतो, वागतो म्हणून पहिल्यांदा जेव्हा त्याचं कौतूक होतं तेव्हाच खरंतर धोक्याची घंटा वाजलेली असते. पण आपण त्याच्या कौतुकात एवढे रममाण होतो की पुढे काय वाढून ठेवलय त्याची आपणाला तेव्हा कल्पनासुद्धा येत नाही. लहानगा टीव्हीसमोर बसल्याने, आपल्याला आपली कामं करता येतात, शांतपणे झोपता येतं म्हणून त्याची आईही खुश असते. तो मोठा होत जातो तशा तक्रारी सुरू होतात. “तो ऎकतच नाही, सारखा कार्टून पाहायचं म्हणून हट्ट धरून बसतो.” थोड्या दिवसानी तो शाळेत जावू लागतो. कार्टूनची समस्या आणखीनच उग्र होते. शाळेतून आल्या आल्या टीव्हीसमोर बसूनच खाणं पिणं चाललेलं असतं. घरच्यांचं कौतूक चालूच आसतं. मुलगा किंवा मुलगी जात्याच हुशार असल्याने अभ्यासात पहिली असतात. पण ती जस जशी पुढच्या वर्गात जातात तस तशी ती अभ्यासात मागे पडत जातात. मग एके दिवशी शाळेतून बोलावणं येतं. मुलांच्या बाबत हळवी असलेली आई रडतच घरी येते. मग शिकवण्या सुरू होतात. पण त्याच्यात काही केल्या सुधारणा होत नाही. एका जागेवर बसून मन लावून अभ्यास काय, कोणतीही गोष्ट करणं अशा मुलाना जमत नाही. एकाच चॅनेलवर कार्टूनसुद्धा ही मुलं बघत नाहीत. एक प्रकारची चंचलता येते आणि तो मग स्वभाव बनतो. मैदानी खेळ न खेळल्यामुळे शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ही समस्या गंभीर आहेच.
घरोघरी असणार्‍या या समस्येवर उपाय काय? असा प्रश्नही विचारला जातो. त्यावर उपाय नक्कीच आहे. कित्येक घरात टीव्ही सकाळी उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत चालूच असतो. हे पहील्यांदा बंद केलं पाहीजे. टीव्ही आपल्यासाठी आहे, आपण टीव्हीसाठी नाही. पालकानीच जर टीव्ही बघायच सोडलं नाही तर मग मुलांना आपण कुठल्या तोंडाने सांगणार आणि काय संस्कार करणार? या बाबतीत दोन तक्रारी सतत केल्या जातात. एक शहरात खेळायला मैदाने शिल्लक नाहीत. दोन जे कार्यक्रम टीव्हीवर असतात तेच तर मुलं बघतात. शहरात मैदानं शिल्लक नाहीत हे खरं आहे. पण हात पाय मोकळे करण्यासाठी मुलांनी पहील्यांदा घराबाहेर पडणं आवश्यक आहे. इमारती भोवती असलेल्या मोकळ्या जागेत मुलं सायकल चालवू शकतात. बर्‍याच ठिकाणी कर्‍हाटे, मल्हखांब किंवा तत्सम खेळ शिकवले जातात. अशा ठिकाणी जावून मुलांना त्या खेळाची आवड निर्माण होईलच पण शारीरिक दृष्ट्या ती तंदूरूस्त होतील. दुसरी बाब सद्ध्या टीव्हीवर चांगले कार्यक्रम दाखवले जात नाहीत हा आक्षेप. काही अंशी ते खरंही आहे. पण टीव्हीवर दिसणारी चॅनेल आपला टी.आर्.पी. कसा वाढेल याचाच विचार करतात. मुलांवर चांगले संस्कार कसे होतील याचा नाही. तो विचार आपण पालकांनी करायचा आहे. मुलांनी काय बघावं हे आपण विचारपुर्वक ठरवलं पाहीजे. त्यांच्याबरोबर तो कार्यक्रम आपण बघितला पाहीजे आणि टीव्ही बंद केला पाहीजे. दिवसातून एकदा तरी राष्टीय किंवा सह्याद्री चॅनेलवरच्या बातम्या बघाव्यात. हळूहळू मुलांना ते बघण्याची सवय लागते. पुर्वी आमच्या लहानपणी चांगल्या मालिका असत असं नुसतं न सांगता जर शक्य असेल तर त्या बाजारातून आणून मुलांना दाखवाव्यात. मुलं त्या आनंदाने बघतात. माझ्या मुलीच्या बाबतीत मी असा प्रयत्न केला आहे आणि तो यशश्वीही झाला आहे. चाणक्य, मालगुडी डेज, महाभारत सारख्या मालिका, वीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके सारख्या सिनेमांच्या सीडीज् बाजारात विकत मिळतात. या सारख्या कार्यक्रमांमुळे प्रबोधन तर होईलच पण मग मुलांना चांगल्या कार्यक्रमांची आवडही लागेल. थोडे प्रयत्न केले तर मुलं कार्टूनपासून दूर रहातात हे मी अनूभवातून सांगू शकतो. ‘निक’ या कार्टून दाखवणार्‍या वाहिनीनेच पुढाकार घेतला म्हणजे समस्या किती गंभीर हे लक्षात येतं. आता इतर वाहिन्यांची वाट न बघता आपणच त्या वाहिन्या वरचे कार्यक्रम बघणं बंद करावं हे उत्तम.

Wednesday, May 15, 2013

'गुंठा मंत्री': पूर्वी जमीन मालक, ते आता सुरक्षा रक्षक म्हणून.

कधी काळी ते आई. टी. ची राजधानी पुणे शेजारच्या जमीनचे मालक होते. आणि आता बिल्डर कडून मिळालेले पैसे अविचाराने संपवून आपल्याच जमिनीवर उभ्या राहिलेल्या इमारीतीमध्ये वाचमेनचे काम करत आहेत. अशिक्षित किंवा कमी शिक्षित शेतकरी आता खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत किंवा त्यांच्या उदरनिर्वाह मिळविण्याचे ऑटो वाहनचालक आहेत.काहीनी पुण्यातील शेतजमीन तीन एकर जमीन विक्री करून .2 कोटी रुपये पेक्षा अधिक कमविले आणि जवळपासच्या गावातील सहा एकर जमीन खरेदी व एक बंगला बांधला आणि एक महागडी एस. यु. व्ही. खरेदी केली. पैसा एक दिवस समाप्त होईल याची त्यांना कधीच कल्पना नव्हती. ते आता एक आणि दीड वर्षांनी महागडी एस. यु. व्ही. विकतात. आणि आता स्वतःची जमीन वरील एका इमारतीत खाजगी सुरक्षा गार्ड म्हणून काम करतात.ही कथा सर्व शेतकरी बांधवांची सारखीच, ज्यांची पुणे आणि पिंपरी चिंचवड दरम्यान जमीन मालकीची होती. या गावां मधील शेतकर्यांनी 90 टक्के भय किंवा इच्छा असेल किंवा हाव यापैकी एका कारणाने खाजगी बिल्डरला त्यांच्या जमीन विकल्या. जमीन विक्री करून कोटी रुपये प्राप्त झाले तेव्हा काहीनी त्यांच्या नोकऱ्या सोडल्या.मी त्यांच्या कुटुंबातील वाढदिवस व अनेक उत्सवचा साक्षीदार आहे. एकदा एकाने पाळलेला कुत्र्याचा आणि गाड्याच्या बैलाचा वाढदिवस साजरा केला. काही दोन वर्षे महिंद्र स्कोर्पिओ चालवून. आता खाजगी वाहन ड्राइव्हर म्हणून काम करत आहेत.मी व्यक्तींचे नावे सांगणार नाही, परंतु येथे वयाच्या 50 वर्षी, एकाला 2008 मध्ये पाच एकर जमीनचे सुमारे 4 कोटी रुपये झाले. पुण्याच्या जवळपास 10 एकर सुपीक जमीन खरेदी केल्यानंतर, तो एक मित्सुबिशी पजेरो खरेदी केली. 18 महिन्यांनंतर विकली आणि एक टाटा सफारी खरेदी केली . 2012 टाटा सफारी विकून आता एक मारुती स्विफ्ट आहे. आणखी एकजण वयाच्या 38 वर्षी, 2006 मध्ये शेती जमीनचे सुमारे 80 लाख रुपये मिळाल्याने त्यांनी काही शेती जमीन खरेदी करून हार्डवेअर स्टोअर उघडले आणि एक ह्युन्दाई सान्त्रो कार विकत घेतली. 2011, तो स्टोअर बंद करून ह्युन्दाई सान्त्रो विकून आता तो स्वत: तीन चाकी चालवतोय. अजून एक जण वयाच्या 40 वर्षी, त्याची पाच एकर जमीन प्राधिकरण मध्ये गेली, आणि आता एक कंत्राटदार सहायक म्हणून काम करत आहे. जमीनशी भावनिक जोड असते, पण शहरीकारानासाठी जमीन जप्त करेन ह्या भीतीने विकतात.

अर्ध अशिक्षित शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना गरजेपेक्षा जास्त खर्च करण्याची सवय , योग्य मार्गदर्शन आणि अनुभव नसताना, नियमित उत्पन्न स्रोत निर्माण न करता देशोधडीला लागतात. ते महाग कार खरेदी आणि त्यांच्या शेजारी पेक्षा एक मोठे घर बांधणी वर भर देतात. गावांमध्ये गाव जेवणाच्या स्पर्धा आणि त्यांच्या लग्नाला समारंभ वर विचार न करता खर्च. आणि एक दिवस, पैसे फक्त त्यांना कोरडा सोडून जातो.

शेती हि आपली पालनहार आहे हे विसरून तिचा बाजारात लिलाव करतात, ती धरणी माता कशी बरे माफ करेल रे. ह्या जन्माची शिक्षा ह्याच जन्मात भोगावी लागते.

आता तरी पैश्याचा माज सोडा हो 'गुंठा मंत्री', चार दिन कि चांदणी आहे हि.

Monday, May 13, 2013

देश के सम्मान को बचाने के लिए एक बहुत छोटी कीमत होगी.


हमारे समय की सबसे बड़ी विडंबना यह है कि लोगों को 'चोर' के रूप में सभी राजनेताओं को देखती है| लेकिन एक ही समय में वे भी देश पर राज करने के लिए बार-बार पंचायत से लेकर संसद तक उन्हें चुनाव करने के लिए मजबूर कर रहे हैं| और, इन 'चोर' जीवन और वे देश को लूटने के लिए की जरूरत है एक गठजोड़ का निर्माण करने के लिए हर पेशे के सभी क्षेत्रों से उन्हें इसी तरह के लोग मिलते है| आपके पास विकल्प है?


अगस्त 2011 में अन्ना हजारे के नेतृत्व में लोकपाल आंदोलन के बाद, भारत परिवर्तन के कगार पर था| लेकिन आयोजित चुनाव के बाद सारी उम्मीदें धराशायी हो गयी| अन्ना के लिए समर्थन घट गया और राजनीतिक दल कामयाब रहे|

जनसंख्या का 60% जो गरीब है उसने भ्रष्टाचार को जीवन का एक भाग के रूप में स्वीकार कर लिया है| जो 30% मध्यम वर्ग, कुछ बदलाव ला सकता है, वो चुनाव को नजरअंदाज करता है| मध्यम वर्ग का सबसे ज्यादा प्रतिशद भ्रष्ट ही है| अन्ना के समर्थन में गिरावट और देश भ्रष्ट द्वारा शासित होना| शायद हम इसीके लायक है?

भारत में रोजगार गारंटी और खाद्य सुरक्षा योजनाओं, आजादी के 65 साल बादभी, लोगों को यह बुनियादी जरूरत नहीं है| भ्रष्टाचार देश में हर समस्या के लिए जिम्मेदार है| एक घोटाला अकेले एक विभाग तक सीमित नहीं है| यह हर एक के जीवन को प्रभावित करता है|

हम चुनाव में भ्रष्टाचार मुख्य मुद्दा बना के, चुनाव के समीकरण बदल सकते हैं| शासक वर्ग अपनी सुविधा के अनुसार कानून बनाता है| जो भी उम्मीदवार कम से कम खर्च पर अपने चुनाव अभियान लड़ता है, उसी के लिए वोट चाहिए| हम ईमानदार उम्मीदवारों और ना की दलों के लिए वोट करे, यह आवश्यक है| कुछ व्यक्तियों के लिए यह मतदान नीति बहस का मुद्दा होगी, जबकि कुछ के लिए यह विसंगत लग सकता है| एक व्यक्ति के तरफ ज़ुकाव ही सही पर हमारी मातृभूमि की लूट होने से कुछ समय के लिए यह पक्षपात ही सही| यह देश के सम्मान को बचाने के लिए एक बहुत छोटी कीमत होगी|