कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी
डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे
स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे
कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा
कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी
कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा
कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी
कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे
पण, पण
कुणाच्या इतक्याही दूर जावू नये
की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच नसावे
3 comments:
thats a amazing poem
u r doing an amazing work creating awarness about morachi chincholi.
from ur website, i am sure many ppl will get an opportunity to visit ur home town !!
cheers
Thanks dear!!
From childhood only, my dream was to make my home town recognize worldwide.
Visitors/well-wishers are always supporting me :)
Thanks for sharing wonderful poem. It's very heart touching. Keep sharing this type of things. chincholi morachi near pune
Post a Comment