Friday, February 18, 2011

नांदा सौख्य भरे!!


आजच्या २१व्या शतकात स्त्री आणि पुरूष दोघे ही खांद्याला खांदा लावून प्रत्येक काम करतात. परंतु आज पण बहुतेक महिला वर्गाला खालील वाक्य एकदातरी त्यांच्या 'पतिदेवा' कडून आएकून घ्यावे लागते.

"तुला यातले काही समजत नाही, तू ह्या मधे तुझे डोके घालू नकोस, तू आपले किचन मधे बघ काय काम असेल तर.. यूस्लेस."

हे सर्व एकल्यावर त्या स्त्री ला किती दुख होत असेल, याचा कोणी सुध्द्धा विचार करत नाही. घरासाठी पती पैसे कमावत असतोच, हे त्याचे कर्तव्य आहे, पण वेळप्रसंगी स्वाताचे दागिने मोडून, नोकरी करून ती सुद्धा संसाराला हात भार लावतेच ना! मग तिने जर दोन चांगल्या गोड शब्दांची अपेक्षा केली तर कुठे बिघडले?

साधे उदाहरण, बर्याच वेळेला आपल्याला वास्तुशन्ति , वाड-दिवस अश्या कार्यक्रमांसाठी आमंत्रण मिळते. तिला खूप वाटते आपणा आपल्या 'पतिदेवा' बरोबर जोडीने जावे, पण हे महाशय कायमच म्हणणार,
"मला खूप काम आहे, तू जाणा मुलान बरोबर... एकटी गेली तर चालणार नाही का?"

म्हणजे तिला काय वाटते त्या आधीच आपला निर्णय सांगून मोकळे व्हायचे.

पण ... अश्या छोट्या गोष्टी घर म्हटले की होतच राहणार. स्त्री ही घरचा खूप मोठा आधार असते.. तिला सय्यम दाखवावच लागतो. आशावादी दृष्टिकोन ठेवावच लागतो. आपल्या संसारसाठी, मुलांसाठी मनाचे क्षितिजे रुंद करवेच लागतात.

आजची शिकलेली स्त्री, प्रत्युतर देऊ शकते. शब्द समर्त्यामुळे कदाचित, ती ह्या भांडणात जिंकू शकेल. पण त्यामुळे तिच्या गोजिर वाण्या संसाराला तडा जाउ शकतो. दुसर्याचा स्वभाव आपण बदलू शकत नाही ना! मग, आपण आपला बदलावा.. (जर आपले घर जपायचे असेल तर).

मला एकाच सांगू वाटते : कधी एकढ्या शांत वेळी आपल्या 'पतिदेवा' ना आपल्या मनातले सुप्त भाव प्रेमाने सांगून, त्यांचे मन जिंकावे.
"प्रेमाने बंध दृढ होतात, प्रत्युतरणे ते तूटतात."


नांदा सौख्य भरे!!

No comments: