Thursday, January 26, 2012

माझ्या बालपणाची चिन्चोली मोराची गांव हरवलाय

आता माझा चिंचोली मोराची गाव पूर्ण बदललाय, म्हणे कृषि पर्यटन केंद्र म्हणून विकसीत झालय। हो ! मी सुद्धा खुप खुश होतो जेव्हा मी माझ्या गावासाठी इन्टरनेट वर वेबसाइट काढली। त्यावरती माहिती जमा करताना, गावातील थोर मोठ्या, लहान, सर्व स्तारातील लोकांना भेटलो। अथक दोन महिन्याच्या मेह्नातिचे फल म्हणून आज मी अभिमानाने माझे गाव सर्व जगासमोर आणले। जग जवळ आले...
काही वर्षांपूर्वी आमच्या गावात, उन्हाळ्यात पाण्याचा खुप बिकट प्रश्न होता, आमची जनावरे आम्हाला पाबलला पांजरपोळ मध्ये पाठवावी लागत। पण आमच्या गावच्या कुशल युवक सरपंच श्री महेश गोर्डे साहेबांच्या अथक परिश्रमाने आणि त्याच्या सरकार दरबारी केलेल्या पाठ पुराव्यामुले गावाचे रुपच पालटून गेले। बघता बघता गावच्या एक एक समस्या संपल्या। गावाचे रूप पालटले, आता गावात Linkत पाणी, विज, डांबरी रस्ते मिळाले। देशा परदेशंतुन पर्यटक गावाला मोर आणि ग्रामीण संस्कृति पहावयास येऊ लागले। MTDC चे पर्यटन केंद्र थोड्याच दिवसात चालु होईल, हे ही खरे। गाव आता प्रगति करतोय, छान वाटते, मी पण आपला 'खारीचा वाटा' म्हणून इन्टरनेट द्वारे माझ्या गावाची माहिती सर्व दूर पोहचवली, आनंद आहे. पण कधी कधी भीती वाटते की, माझा गाव ह्या प्रगतीत हरवणार तर नाही ना ...
-------------------------------------------------------------------------------
खालिल काही गोष्टी काल्पनिक आहेत, पण ती सत्यात उतरायला फार वर्ष नाही लागणार...
-------------------------------------------------------------------------------
] पण आज जेव्हा मी पाहतो, तेव्हा एकच खंत वाटते, आता घरो घरी फ़क्त पर्यटक दिसतात, आणि घरातील प्रत्येक माणुस हा त्यांच्या सेवेसाठी हजर असतो। भाऊ बिजेला, नाग पंचमीला, रक्षाबंधला बहिन घरी येते तर, तेव्हा तिला जसे जसे गावचे ST स्टैंड जवळ येते, तेव्हा वाटत असते की, आता माझा भाऊ राया आतुरतेने माझी आणि माझ्या बालांची त्यांची आजी वाट पाहत असेल। ती ST स्टैंड वर उतरते, भाऊ राय त्याच्या मोटरसाइकिल वर पण दिसतो तिला, तिला खुप हायसे वाटते, तिला वाटते की भाऊ आपली ह्या उन्हात वाट पाहत उभा आहे, पण तो म्हणतो, "अग ताई, आलीस, छान... बरे झाले तू आलीस, आज आपल्याकडे जरा जास्त पर्यटक आहेत, तेव्हा पटकन, आपल्या शेतातील वाटेने घरी जा आणि आईला भाकरी करू लाग। मी आलोच पर्यटक लोकाना घेउन। तू हो पुढे।" तेव्हा ती म्हणते ... "अरे दादा कमीत कमी आज तरी आपल्या नात्यासाठी वेळ काढ।" पण त्याचे लक्ष फ़क्त मोबाइल वर येनारया फ़ोनकड़े ..... पानाव्लेल्या डोळ्यानी ती घरी पोहचते.

] गाव एक, आणि इन्टरनेट वर कृषि पर्यटन संकेत स्थले अनेक। अशी तरह नको व्हायला। ह्या पर्यटन व्यवसायात आपला गाव हरवेल आणि, त्याली शहरी बकाल स्वरुप प्राप्त होईल। येणारा प्रत्येक पर्यटक निर्मल भावनेने येईलच असे नाही................. (जास्त लिहित नाही पण, काही गोष्टी न लिहिताच समजतात)। लोनावला, कर्जत प्रमाने रेव पार्टीचे प्रकार ही घडतील (जर गावात मद्यापानाला मज्जाव नाही केला तर),
---------------------------------------------------------------------------

माझी माझ्या गावातील सर्वाना एकच विनती आहे की, कृषि पर्यटन, शेतीसाठी जोड़ धंदा म्हणून करा। पण आपली नाती आणि आपल्या नात्यातील ओलावा विसरु नका। कारण, पर्यटक हे फ़क्त काही क्षणांचे पाहुणे आहेत, त्यांच्या साठी आपली मानस विसरु नका. आणि आपला गाव हा, प्रदुषण मुक्त, हिरवालीने भरलेला आणि मोरांच्या आवाजाने बहरलेला राहिल ह्या गोष्टीची कलजी घ्या..

No comments: