आज खूप ठिकाणी ' राजे तुम्ही परत जन्मला या' असे पोस्त पाहतो आहे. खरेच शिवाजी म्हराज्याना परत जन्म घेण्याची गरज आहे का?
आज आमच्या मराठी लोकांचे रक्त इतके थंड झाले आहे का ज्याला गरम करण्यासाठी शिवाजी महाराज्याना जन्म घेण्याची परत गरज आहे. आम्ही काही करू शकत नाही का कि आमच्या शौर्याला गंज लागले आहे का ?
शिवाजी महाराज्यानी जवळ जवळ ३५० वर्ष्यापुर्वी सामान्य माणसाचे, हिंदू धर्माचे स्वराज्य स्थापन केले. शून्यातून निर्माण केलेल्या या स्वराज्याचा धसका साऱ्या मुघलशाही ने घेतला. गरिब रयतेच्या या राजाला न्यायासाठी सारे सारखे होते. न्यायदानाच्या प्रक्रियेतून स्वत्ताचा मुलगा संभाजी राजे हि सुटले नाहीत. गोदावरी प्रकरण एक षडयंत्र होते पण जर गोदावरीने आत्महत्या नसती केली तर कदाचित त्यांनी शंभू राज्यानाही कडक शिक्षेला सामोरे जावे लागले असते. असा जनतेचा राजा परत जन्मला यावा असे साऱ्यांना वाटेल.
पण कधीपर्यंत आम्ही हातावर हात धरून बसून शिवाजी महाराज्यांसारख्या वीर पुरुषाला परत जन्म घेवून कष्ट द्यायचे.
मृत्यू नंतर आपल्या हिंदू धर्मात स्वर्ग आणि नर्क असे दोन जग आहेत. जो चांगले काम करतो तो स्वर्गात जातो. त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळते तो माणूस स्वर्गात जावून सारी सुख उपभोगतो अनंत कालपर्यंत. आणि जो नरकात जातो तो ८४लख योनीतून जन्मह घेवून परत मनुष्य जन्म घेतो. या प्रकारात माझे मत आहे शिवाजी महाराज हे स्वर्गात असतील. त्यांनी आपल्या पुर्वाज्यांसाठी अनेक कष्ट उपसले. आपल्या पुर्वाज्यांमध्ये अन्यायाविरुध लढण्याची ताकद निर्माण केली. एक जमीनदार म्हणून सारी सुख शिवाजी महाराज्यांकडे होते . इतर मराठा सर्दारांप्रमाणे तेही ऐशो आरामात राहिले असते पण त्यांनी आपल्या साठी आपल्या हिंदू धर्मासाठी काटेरी मार्ग स्वीकारला. आणि एवढे त्रास घेवून आपल्या मराठ्यांना भारताच्या इतिहासात ,हिंदू धर्मात एक स्थान मिळवून दिले. आणि आज आपण ' राजे तुम्ही परत जन्मला या म्हणून परत एकदा त्रास देवू इच्छितो. लाज वाटली पाहिजे आपल्याला ज्या कुलात शिव छत्रपती सारखे वीर पुरुष जन्मला येवून एक प्रेरणा दिली असताना सुद्धा आपण एका अबले सारखे त्यांना जन्मला या म्हणून सांगत आहोत. आठवा शिवाजी महाराज्यांच्या एका हाकेवर आपले पूर्वज आपल्या घरा दारावर तुळशीपत्र ठेवून एका पायावर बाहेर पडले हिंदवी स्वराज्यासाठी! आज आपल्यात शिवाजी राजे नसले म्हणून काय झाले त्यांच्या आठवणी त्यांच्या प्रेराना तर आहेत ना अहो आपल्यातच एक शिवाजी राजे लपले आहेत फक्त जागे करण्याची गरज आहे.
त्यांना परत जन्मला या म्हणून त्रास देण्यापेक्षा आपल्यातले शिवराय जागे करा मग पहा या देशात हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकणे अशक्य नाही कारण जगात अशक्य असे काहीच नाही. आणि ज्यांच्या पाठीमागे शिवरायांचा आशीर्वाद असेल त्यांच्यासाठी ते कधीच अशक्य नाही .
मला माहित नाही माझे मत तुम्हाला पटेल किवा नाही पण मी माझ्या मनातली गोष्ट तुमच्या सोबत शेअर केली कारण आपल्या गोष्ठी आपल्या मित्रांसोबतच शेअर करू शकतो ना पहा तुम्हाला पटते का आपल्या प्रतिक्रियेची मी कॉमेंट च्या स्वरुपात वाट पहात आहे काही चुकल्यास मला सांगावे कारण चुकी दाखवणे हे मित्रांचे काम आहे आणि एवढी अपेक्षा नक्की करू शकतो.
No comments:
Post a Comment