Monday, March 7, 2011

माणुसकीचा प्रत्यय

माझा एक छोटासा अनुभव: (आहे शुल्लक पण वाटले की सांगावे)

वेळ: ०१ मार्च २०११ संध्याकलचे ०५:५०। ठिकाण: गोल्फ क्लब रोड, येरवडा।

जे घडले माझ्याबरोबर ते कधी न कधी आपण दुचाकी स्वारांच्या आयुष्यात तर घडतच असते... ते म्हणजे "गाडी पुम्चर होने। "

गाडी पुम्चर झाल्यावर आपण पुम्चर च्या दुकानात जातो, आणि आजकल चे हे दुकानदार बरोबर आपली गरज पाहून, एकच उत्तर देतात, "साब टुब बदलना पड़ेगा!" आपण कितीही गया वया केलि तरी, ते त्याच उत्तरावर अडून असतात, नाइलाजस्तव आपण ३० रुपयाच्या गोष्टी करीता २०० रुपये घालवून बसतो। काय करणार "अडला हरी , गाढवाचे पाय धरी".

पण माझा अनुभव थोडा वेगला आहे। ते म्हंझे असे झाले की माझी पण गाडी पुन्चर झाली होती, तब्बल ४ होल्स आणि एक ठिकाणी टायर फाटला होता। त्याने जेव्हा चेक केले तेव्हा तो सुधा हेच म्हणाला। पण मी त्याला म्हणालो, की आज माझ्याजवल फक्त १०० रुपये आहेत, तुम्ही जर हे एवढ्या पैशात करू शकत असाल तर ठीक आहे, नाही तर मी नेतो गाड़ी ढकलत।" तो म्हणाला, "साहेब, जर गाडी आशय अवस्थेत नेली तर, आपले आजुन जास्त नुकसान होईल।" "आपण रहायला, कोठे आहात?" मी उत्तरलो," निगडी" ....

त्याने एक मिनट विचार केला आणि म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुमची गाडी रिपैर करून देतो, पैसे राहू द्यात। " मला माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही, जिथे शहरामध्ये प्रत्येक जन ग्राहकाला लुटायला बसलेला असतो, तिथे हा व्यक्ति मला अगदी देवासारखा वाटला, सर्व काम करायला त्याचा जवळ जवळ १ तास गेला, त्या नंतर म्हणाला " साहेब, आपल्या गाडीचा टायर ठीक झाला आहे, आपण जाऊ शकता" मी म्हणालो, "तुमचे पैसे मी उद्या नक्की देईन, तुम्ही केलेली मदत मी कधीच विसरणार नाही", तेव्हा तो म्हणाला," साहेब, हे सर्व जग विश्वासावर चालते, मला तुमच्यात भला मानुस दिसला म्हणून मी तुम्हाला मदत केली। पैसे तर मी रोजच कमवतो, म्हटले आज पुण्य कमवून बघुया... तुम्ही पैसे दया अगर नका देऊ, तो परमेश्वर वरून सर्व काही पाहत आहे। कालजी घ्या आणि व्यवस्थित घरी पोहचा, आपली कोणी तरी वाट पाहत असेल "....

दुसरया दिवशी मी त्या सदग्रहस्ताला त्याच्या कष्टाचे पैसे देऊ केले... पण एक गोष्ट मी समजलो की, आपण समजतो तेवढे जग निष्ठुर नाहीये।

"विश्वासावर सर्व काही चालते, जिथे विश्वास संपतो तिथे सर्वच संपते..."

Friday, February 18, 2011

नांदा सौख्य भरे!!


आजच्या २१व्या शतकात स्त्री आणि पुरूष दोघे ही खांद्याला खांदा लावून प्रत्येक काम करतात. परंतु आज पण बहुतेक महिला वर्गाला खालील वाक्य एकदातरी त्यांच्या 'पतिदेवा' कडून आएकून घ्यावे लागते.

"तुला यातले काही समजत नाही, तू ह्या मधे तुझे डोके घालू नकोस, तू आपले किचन मधे बघ काय काम असेल तर.. यूस्लेस."

हे सर्व एकल्यावर त्या स्त्री ला किती दुख होत असेल, याचा कोणी सुध्द्धा विचार करत नाही. घरासाठी पती पैसे कमावत असतोच, हे त्याचे कर्तव्य आहे, पण वेळप्रसंगी स्वाताचे दागिने मोडून, नोकरी करून ती सुद्धा संसाराला हात भार लावतेच ना! मग तिने जर दोन चांगल्या गोड शब्दांची अपेक्षा केली तर कुठे बिघडले?

साधे उदाहरण, बर्‍याच वेळेला आपल्याला वास्तुशन्ति , वाड-दिवस अश्या कार्यक्रमांसाठी आमंत्रण मिळते. तिला खूप वाटते आपणा आपल्या 'पतिदेवा' बरोबर जोडीने जावे, पण हे महाशय कायमच म्हणणार,
"मला खूप काम आहे, तू जाणा मुलान बरोबर... एकटी गेली तर चालणार नाही का?"

म्हणजे तिला काय वाटते त्या आधीच आपला निर्णय सांगून मोकळे व्हायचे.

पण ... अश्या छोट्या गोष्टी घर म्हटले की होतच राहणार. स्त्री ही घरचा खूप मोठा आधार असते.. तिला सय्यम दाखवावच लागतो. आशावादी दृष्टिकोन ठेवावच लागतो. आपल्या संसारसाठी, मुलांसाठी मनाचे क्षितिजे रुंद करवेच लागतात.

आजची शिकलेली स्त्री, प्रत्युतर देऊ शकते. शब्द समर्त्यामुळे कदाचित, ती ह्या भांडणात जिंकू शकेल. पण त्यामुळे तिच्या गोजिर वाण्या संसाराला तडा जाउ शकतो. दुसर्‍याचा स्वभाव आपण बदलू शकत नाही ना! मग, आपण आपला च बदलावा.. (जर आपले घर जपायचे असेल तर).

मला एकाच सांगू वाटते : कधी एकढ्या शांत वेळी आपल्या 'पतिदेवा' ना आपल्या मनातले सुप्त भाव प्रेमाने सांगून, त्यांचे मन जिंकावे.
"प्रेमाने बंध दृढ होतात, प्रत्युतरणे ते तूटतात."


नांदा सौख्य भरे!!

Saturday, January 29, 2011

ओर्कुट,फेसबुक - आभासी दुनिया


तरुण वयातील मुले मुली हि ओर्कुट,फेसबुक संकेतस्थळावर अक्षरशा पडीक असतात।यामागे नवीन गोष्टीचे आकर्षण,मनोरंजन अशा बाबी असल्या तरी त्याचा त्यांच्या मनावर आणि विचार करण्याच्या पद्धतीवर खोलवर परिणाम होत असतो.


या आभासी दुनियेत प्रत्येकजण आपली एक प्रतिमा तयार करायच्या मागे लागलेला असतो तो तसाच खरया जीवनात असेल असे सांगता येत नसले तरी काही कालावधी नंतर आपण त्या प्रतिमेप्रमाणेच आहोत असे त्याला वाटू लागते परंतु खरी परिस्थिती तशी नसते आणि ती समोर आली कि त्याला धक्का बसतो।
खरया आयुष्यात आपणाला जे काही बोलता येत नाही किंवा जसे वागता येत नाही परंतु तशी खूप इच्छा असते अशा गोष्टींची पूर्तता हि आभासी दुनिया करते।

आभासी जगात जगताना आपणाल जसे हवे आहे तसे जगता येते परंतु तसेच खऱ्या आयुष्यात जगता येत नाही आणि असे झाले कि मनाला खूप त्रास होतो आणि चीड चीड होते
त्यामुळे आपण जसे आहोत आपला स्वभाव जसा आहे तसा इथे मांडत राहावे त्यामुळे त्याचे काय परिणाम भावी आयुष्यात होऊ शकतात ते येथील चर्चेने आणि मैत्रीने समजू शकते

शेवटी कस जगायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे
फक्त एक आहे आपण इथे आभास निर्माण करून स्वताला फसवत असतो

या आभासी दुनयेचे व्यसन हो व्यसनच कधी लागते हे समजतच नाही आणि माणूस यात वाहून जातो वेळीच यावर उपाय नाही केला गेला तर आपल्या वैयक्तिक आयुष्याला यामुळे हानी पोहचू शकते.