Tuesday, June 18, 2013

तो बाप दु:खी होतोच ना?

काळ खुप लवकर बदलतो आहे. तसा तो बदलणारच. आमचा काळ वेगळा होता आणि आजचा वेगळा आहे. जग झपाट्याने बदलत चाललय, असं असलं तरी माणूस जुन्या काळातच जास्त जगत असतो म्हणायचं. आमच्या काळात वडीलांसमोर ब्र काढण्याचीही सोय नव्हती पण आता मुलं आई-वडीलांशी सहज बोलतात. माझ्या एका मित्राच्या मुलीचं लग्न ठरलं आहे. त्या लग्नाचा आनंद असण्यापेक्षा ते कसं पार पडेल याचीच त्या मित्राला काळजी वाटत आहे. बाकी सगळं ठिक ठाक असलं तरी लग्नासाठी होणारा खर्च हा मुख्य विषय आहे. आपल्या भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढून तो हे कार्य पार पाडणार म्हणतो, तेव्हा मुलगी विचारते की तुम्ही आयुष्यभर एकाच नोकरीत टिकून राहिलात. काय कमवलं तिथे राहून?




माझा हा मित्र कर्नाटकातल्या आपल्या गावातून मुंबईत आला. सोबत आजारी आई-वडील. वडील लवकर देवाघरी गेले म्हणून याला आपलं भविष्य घडवण्याच्या काळातच लग्न करावं लागलं कारण घरात आजारी आई होती. मिळालेली नोकरी टिकऊन आणि ती इनामे इतबारे करून त्याने आपला संसार सांभाळला. त्याची एकमेव मुलगी शिकली, आय टी मध्ये नोकरीला लागली, आय टी वाल्यांची तर्‍हाच वेगळी, नोकरी बदलण्याचं त्यांना काहीच वाटत नाही. वाटायला पण नको. आताच्या काळाप्रमाणे ते बरोबरही असेल, पण आपण तसं करतो म्हणून आपल्या वडीलानीही तसंच केलं पाहिजे होतं असं कसं होऊ शकतं? प्रामाणिकपणे नोकरी करून त्याने आपला संसार केला, मुलीला मोठी केली आता तो आपल्या ताकतीप्रमाणे तिचं लग्न करू पाहतोय, तेव्हा त्याला काय कमावलं आयुष्यभर? एवढंच? असा प्रश्न विचारला गेला तेव्हा तो बाप दु:खी होतोच ना?

Tuesday, June 4, 2013

Survival with this inflation with minimum wages.... Everyone is facing same



I am not the only person, who is experiencing this huge gap in earning and expenditure.

"Education courses worth Rs 7 lakh to cost Rs 56 lakh in 15 years” said a Times of India headline today. Education costs are going up for sure. Just 10 years back a Bachelor of Pharmaceutical Scientist degree cost Rs 20,000 for a four-year course, and now the same course cost around Rs 6 lakh. In fact, the ToI report notes that over the last 15 -20 years, the cost of education in India has gone up by as much as 14-15 percent, compared with the general rate of inflation of around 7 percent.


Now let’s just take a look at house hold items, a loaf of bread cost Rs 9 in 2004-05, in 2008-09 the same bread cost Rs 13, today it costs Rs 22. LPG cylinder in 2004-05 cost around Rs 251, by 2008-09 it went to around Rs 350, today subsidized LPG costs Rs 450. A Mumbai-London air ticket cost in 2004-05 was around Rs 19,990, in 2008-09 around Rs 27,000 and today around Rs 32,400. Clearly, everything under the sun is becoming expensive, why wouldn’t the cost of education?

And if that’s not enough to blow your mind off, sample this calculation. Suppose you are 30 years old today, with a monthly household expense of Rs 50,000, and a monthly saving of Rs 20,000. Assuming your investments earn an interest of 8.5 percent with an inflation of 7.5 percent, you would be able to save a retirement corpus of Rs 3,09,55,836. Don’t be too impressed with the number. To maintain your current life style you would actually need Rs 6,17,99,684. That’s Rs 3,0,8,43,848 less.

This clearly shows that be it cost everything has gone up, even the cost for your child’s education — a short term financial goal — or retirement needs — a long term financial goal — you will surely need to put aside some serious money. And that’s not at all, you will also need to do some major financial planning.
Day by day, cost of ‘surviving’ is going beyond our scope. And each head earning in the family is at same level, which was before 2 years. Virtual growth can be seen with day by day gradually; however it’s linked with ‘loan’ term, which is ticking needle in the life. Life is revolving around EMIs, daily expenses and making adjustment with fixed income which is stiff, failed to grow.

If I put down all counts in numbers, I feel afraid to live and think of other source of income to fulfill the liabilities. No change in earning, it’s constant Rs. 100/- from last 2 years.

Thursday, May 30, 2013

तो ऎकतच नाही, सारखा कार्टून पाहायचं म्हणून हट्ट धरून बसतो

लहान मुलगा बोलालया लागला, तो शिनचॅन सारखाच बोलतो, वागतो म्हणून पहिल्यांदा जेव्हा त्याचं कौतूक होतं तेव्हाच खरंतर धोक्याची घंटा वाजलेली असते. पण आपण त्याच्या कौतुकात एवढे रममाण होतो की पुढे काय वाढून ठेवलय त्याची आपणाला तेव्हा कल्पनासुद्धा येत नाही. लहानगा टीव्हीसमोर बसल्याने, आपल्याला आपली कामं करता येतात, शांतपणे झोपता येतं म्हणून त्याची आईही खुश असते. तो मोठा होत जातो तशा तक्रारी सुरू होतात. “तो ऎकतच नाही, सारखा कार्टून पाहायचं म्हणून हट्ट धरून बसतो.” थोड्या दिवसानी तो शाळेत जावू लागतो. कार्टूनची समस्या आणखीनच उग्र होते. शाळेतून आल्या आल्या टीव्हीसमोर बसूनच खाणं पिणं चाललेलं असतं. घरच्यांचं कौतूक चालूच आसतं. मुलगा किंवा मुलगी जात्याच हुशार असल्याने अभ्यासात पहिली असतात. पण ती जस जशी पुढच्या वर्गात जातात तस तशी ती अभ्यासात मागे पडत जातात. मग एके दिवशी शाळेतून बोलावणं येतं. मुलांच्या बाबत हळवी असलेली आई रडतच घरी येते. मग शिकवण्या सुरू होतात. पण त्याच्यात काही केल्या सुधारणा होत नाही. एका जागेवर बसून मन लावून अभ्यास काय, कोणतीही गोष्ट करणं अशा मुलाना जमत नाही. एकाच चॅनेलवर कार्टूनसुद्धा ही मुलं बघत नाहीत. एक प्रकारची चंचलता येते आणि तो मग स्वभाव बनतो. मैदानी खेळ न खेळल्यामुळे शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ही समस्या गंभीर आहेच.




घरोघरी असणार्‍या या समस्येवर उपाय काय? असा प्रश्नही विचारला जातो. त्यावर उपाय नक्कीच आहे. कित्येक घरात टीव्ही सकाळी उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत चालूच असतो. हे पहील्यांदा बंद केलं पाहीजे. टीव्ही आपल्यासाठी आहे, आपण टीव्हीसाठी नाही. पालकानीच जर टीव्ही बघायच सोडलं नाही तर मग मुलांना आपण कुठल्या तोंडाने सांगणार आणि काय संस्कार करणार? या बाबतीत दोन तक्रारी सतत केल्या जातात. एक शहरात खेळायला मैदाने शिल्लक नाहीत. दोन जे कार्यक्रम टीव्हीवर असतात तेच तर मुलं बघतात. शहरात मैदानं शिल्लक नाहीत हे खरं आहे. पण हात पाय मोकळे करण्यासाठी मुलांनी पहील्यांदा घराबाहेर पडणं आवश्यक आहे. इमारती भोवती असलेल्या मोकळ्या जागेत मुलं सायकल चालवू शकतात. बर्‍याच ठिकाणी कर्‍हाटे, मल्हखांब किंवा तत्सम खेळ शिकवले जातात. अशा ठिकाणी जावून मुलांना त्या खेळाची आवड निर्माण होईलच पण शारीरिक दृष्ट्या ती तंदूरूस्त होतील. दुसरी बाब सद्ध्या टीव्हीवर चांगले कार्यक्रम दाखवले जात नाहीत हा आक्षेप. काही अंशी ते खरंही आहे. पण टीव्हीवर दिसणारी चॅनेल आपला टी.आर्.पी. कसा वाढेल याचाच विचार करतात. मुलांवर चांगले संस्कार कसे होतील याचा नाही. तो विचार आपण पालकांनी करायचा आहे. मुलांनी काय बघावं हे आपण विचारपुर्वक ठरवलं पाहीजे. त्यांच्याबरोबर तो कार्यक्रम आपण बघितला पाहीजे आणि टीव्ही बंद केला पाहीजे. दिवसातून एकदा तरी राष्टीय किंवा सह्याद्री चॅनेलवरच्या बातम्या बघाव्यात. हळूहळू मुलांना ते बघण्याची सवय लागते. पुर्वी आमच्या लहानपणी चांगल्या मालिका असत असं नुसतं न सांगता जर शक्य असेल तर त्या बाजारातून आणून मुलांना दाखवाव्यात. मुलं त्या आनंदाने बघतात. माझ्या मुलीच्या बाबतीत मी असा प्रयत्न केला आहे आणि तो यशश्वीही झाला आहे. चाणक्य, मालगुडी डेज, महाभारत सारख्या मालिका, वीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके सारख्या सिनेमांच्या सीडीज् बाजारात विकत मिळतात. या सारख्या कार्यक्रमांमुळे प्रबोधन तर होईलच पण मग मुलांना चांगल्या कार्यक्रमांची आवडही लागेल. थोडे प्रयत्न केले तर मुलं कार्टूनपासून दूर रहातात हे मी अनूभवातून सांगू शकतो. ‘निक’ या कार्टून दाखवणार्‍या वाहिनीनेच पुढाकार घेतला म्हणजे समस्या किती गंभीर हे लक्षात येतं. आता इतर वाहिन्यांची वाट न बघता आपणच त्या वाहिन्या वरचे कार्यक्रम बघणं बंद करावं हे उत्तम.